सांगली : कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील तेली समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळाल्यास समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होईल. समाजाचा पारंपरिक व्यवसाय इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असताना स्वयंरोजगार मिळवून तरुणांनी स्वावलंबी होण्याची गरज आहे, असे मत कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी केले. उपमुख्यमंत्री व भाजपच्या महाराष्ट्र प्रभारीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा अखिल भारतीय तेली समाजाचे कार्यकारिणी सदस्य विजय संकपाळ यांच्यासह शिष्टमंडळाने सत्कार केला.
ते म्हणाले, "तेली समाज खऱ्या अर्थाने अल्पसंख्याक आहे. समाजाचा परंपरागत व्यवसाय जागतिकीकरणाच्या रेट्यात केव्हाच संपला. समाजासमोर अनेक आव्हाने आहेत. त्या आव्हानांना भिडण्यासाठी समाजाने तयारी ठेवावी." विजय संकपाळ यांनी समाजाच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी बळ देण्याची मागणी केली.